नेर्लीतील बावची पवार वस्ती साकव पुलाचे काम पूर्ण ४५ वर्षांचा वनवास संपला : सरपंच राजाराम शिंदे सरकार

नेर्ली गावातील बावची पवार वस्ती येथील ओढ्यावर पूल व्हावा यासाठी परिसरातील नागरिक अंदाजे ४५ ते ५० वर्षांपासून लोकप्रतिनिधी कडे मागणी करीत होते, निवडणूक आली कि फक्त आश्वासन मिळत होते, पण काम कोणीही करून दिले नाही, पावसाळ्यात ओढ्याला पाणी असल्यामुळे ओढा ओलांडून लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी व परत आणण्यासाठी नागरिकांना मुलांना खांद्यावर उचलून ओढ्यापलीकडे सोडावे लागत होते, मोठी मुले एकमेकांना आधार देत ओढा पार करीत होती, पालकाना मुलांना शाळेत सोडणे आणि आणणेसाठी स्वतः बरोबर जावे लागत, महिलांना सुद्धा ओढा ओलांडून गावात जाणे येणे मुश्किल होत होते, पूर्वी फक्त पावसाळ्यात हा त्रास होत होता, पण आता टेम्भूचे पाणी आल्यामुळे बाराही महिने या ओढ्याला कमी जास्त पाणी पाणी असते, ग्रामपंचायत स्थापन होऊन ६७वर्ष झाली पण नागरिकांच्या या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही.

ग्रामपंचायत निवडणुकीच्यावेळी परिसरातील नागरिकांनी, महिलांनी एकमुखाने ओढ्यावर पूल बांधण्याची मागणी मा राजाराम शिंदे सरकार यांच्याकडे केली, पूल नसल्याने मुलांची, महिलांची ओढा ओलांडून जाणे येणेची अडचण सांगितली होती त्यावेळी मा राजाराम शिंदे सरकार यांनी शब्द दिला होता निवडून आल्यावर तातडीने पुलाचे काम करून देईल, निवडून आल्यावर नेर्लीचे लोकनियुक्त सरपंच मा.श्री.राजाराम शिंदे सरकार यांनी ताबडतोब अंदाजपत्रक मंजूर करून घेतले आणि स्वतः उभे राहून साकव पुलाचे दर्जेदार काम करून घेतले, निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करून वचनपूर्ती केली, इतक्या वर्षांची प्रलंबित मागणी तातडीने पूर्ण केल्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

याकामी उपसरपंच मा प्रकाश कांबळे, ग्रामसेवक सुरेंद्र प्रताप, ग्रामपंचायत सदस्य शंकर मुळीक, संजय मोहिते, अभिजित वलेकर सदस्या मुमताज मुजावर, मदिना आगा, सुरेखा लोंढे, गंगुबाई गायकवाड, संजीवनी पवार, नेर्ली सोसायटी चेअरमन चंद्रकांत पाटील, पंचायत समिती सभापती मंगल क्षीरसागर, देवेंद्र शिंदे सरकार, सिकंदर मुजावर, सिकंदर मुल्ला, फौजी दादासाहेब पवार, जेष्ठ नेते के जी पवार, पांडुरंग पवार अमोल पवार, संजय पवार, अनिरुद्ध देशमुखे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top