नेर्ली गावात दलित, भटक्या जमाती, ओबीसि वस्त्या मधील काही भाग, तसेच गावातील इतर समाजाच्या काही वाडया वस्त्या आजपर्यंत अंधारात होत्या, जुन्या ग्रामपंचायत इमारती मध्ये बरेच जि आय पाईप पडलेले सरपंच मा श्री राजाराम शिंदे सरकार यांच्या निदर्शनास आले.
गावात बऱ्याच बोअर वर विद्युत मोटारी बसवल्यामुळे जि आय पाईप काढून ठेवल्या होत्या, जि आय पाईपच्या सुंदर स्ट्रीट लाईट पोल तयार करून गावात आंबेडकर नगर, रामोशी वस्ती, मायाक्का नगर / बेलदार वस्ती, मातंग वस्ती परीट गल्ली, सुतार गल्ली, कोतवडे रोड, महादेव मंदिर, वार्ड नंबर ३ सूर्यवंशी कॉलनी, पाटील कॉलनी, शिंदे मळा रोड, मुजावर कॉलनी मोमीन वस्ती भागात पोल उभे केले, सरपंच हे स्वतः विद्युत ठेकेदार असल्यामुळे विद्युत सुरक्षा नियमाचं पालन करून सर्व स्ट्रीट लाईट चालू करून घेतले, गावात स्ट्रीट लाईट बल्ब डीम लागत होते, लोड बॅलन्स करून घेतल्यामुळे बल्ब पूर्ण क्षमतेने प्रकाश देत आहेत, या सर्व कामाला अंदाजे साडेसात ते आठ लाख खर्च आला असता पण किरकोळ रकमेतून मध्ये हे काम पूर्ण झाले, या सर्व वस्त्या अंधारातून प्रकाशात आल्यामुळे सर्व नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
सर्व वस्त्यातील नागरिक सरपंच मा श्री राजाराम शिंदे सरकार यांना भेटून आभार व्यक्त करीत आहेत, पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायत ने डी पि डी सि योजनेतून स्ट्रीट लाईट पोल मंजूर करून चार स्ट्रीट लाईट मिटरचे कोटेशन भरले होते, सरपंच मा श्री राजाराम शिंदे सरकार यांनी महावितरण च्या कडेगाव, विटा, कोल्हापूर, कार्यालयाशी, तसेच ऊर्जामंत्री मा श्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पत्रव्यवहार केला आजपर्यंत काही उत्तर आले नाही, उपकार्यकारी अभियंता कडेगाव यांनी सांगितले डी पि डी सिचा निधी संपला आहे, स्थानिक आमदारांच्या कडे निधी मागणी करा, स्थानिक आमदारांच्या कडे निधी मागणी केला आहे पण आजपर्यंत निधी मिळाला नाही, यापूर्वी नेर्ली गावासाठी निधी मंजूर करून कोटेशन भरून घेतले मग निधी गेला कुठे हा एक प्रश्न आहे, यंत्रनेच्या हलगर्जी पणामुळे सामान्य नागरिक मूलभूत सोई सुविधा पासून वंचित राहतोय, दलित वस्त्यामध्ये लाखो रुपयाचा निधी येतोय पण, अधिकारी ग्रामसेवक यांना काँक्रेट रस्ता आणि सिमेंट ब्लॉक बसवण्याचं काम सुचवा असे सांगतात.
ग्रामसेवक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे काम सुचवण्याचा प्रयत्न करतात, अल्प शिक्षित सरपंच सदस्य या प्रकाराला बळी पडतात, यामुळे रस्ते उंच झालेत घर खाली झालीत, मूलभूत गरजपासून सर्व समाज वंचित राहिलेत, खरं तर ग्रामसभेने, सरपंच आणि सदस्यांनी कामे सुचवायचे असतात, गावात सर्व वाड्या वस्त्यावर लवकरच सोलर स्ट्रीट लाईट बसवणार आहे, पाणीपुरवठा पंपाला सुद्धा सोलर पॅनेल बसवून घेणार आहे त्यामुळे ग्रामपंचायत ला वीजबिलापासून मुक्ती मिळेल असे नेर्ली गावचे लोकनियुक्त सरपंच मा श्री राजाराम शिंदे सरकार यांनी सांगितले.

